चेंबूरच्या टिळकनगर भागात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच भिवंडी शहरातही एका भंगार गोदामामध्ये भीषण आग भडकली आहे. भिवंडी शहरात याआधी सुद्धा अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
Maharashtra: Fire broke out in a warehouse in Bhiwandi, Thane earlier today. Fire tenders were rushed to the spot, no casualty reported. More details awaited. pic.twitter.com/11bInfGWZ6
— ANI (@ANI) December 28, 2018
भिवंडीच्या भंडारी कपांऊड परिसरातील भंगार गोदामाला आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गोदामात कागदी आणि पुठ्ठयाच्या वस्तूंचा साठा केलेला होता. त्यामुळे आग अधिक वेगाने पसरली.
या आगीमध्ये गोदामाच्या शेजारी असलेले दुकान आणि एक दुचाकी सुद्धा जळून खाक झाली आहे. आगीत गोदामही जळून खाक झाल्याची माहिती आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरातील सरगम इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.