ठाणे : सीपी तलाव परिसरातील ठाणे महापालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रावर साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाला शुक्रवारी आग लागली होती. त्यापाठोपाठ सोमवारी सकाळीही या केंद्रातील कचऱ्याला आग लागली. सातत्याने लागत असलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी शहरातील विविध भागात संकलित होणारा कचरा आणला जातो आणि त्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. यानंतर तो डायघर येथे नेला जातो. असे असले तरी याठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण आहेत. असे असतानाच, केंद्रावर साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाला शुक्रवारी आग लागल्याने परिसरात धूर पसरून नागरिकांना त्रास झाला. यामुळे शिंदेचे समर्थक आक्रमक झाले. यापुढे या केंद्रावर एकही कचरा गाडी आणू नका आणि गाडी आणण्याचा प्रयत्न केला तर गाड्या फोडून टाकू असा इशारा शिंदे समर्थकांनी दिला होता.

शुक्रवारी लागलेली आग पालिकेच्या अग्निशमन विभागाने पूर्णपणे विजवली होती. असे असतानाच, सोमवारी सकाळी७.३० वाजता केंद्रावरील कचऱ्याला पुन्हा आग लागली. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. या परिसरात आगीमुळे धूर पसरल्याने नागरिकांना त्रास झाला. सातत्याने लागत असलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

कचरा केंद्राला लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी ९.५१ वाजताच्या सुमारास विजविली असुन परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे.

Story img Loader