बदलापूर: बदलापुरातील मांजर्ली भागात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील दस्त खोलीला आग लागल्याची घटना सोमवारी समोर आली. शॉर्ट सर्किटमुळे ही लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र कागदपत्रांचे यापूर्वीच संगणकीय प्रणालीत रूपांतर करण्यात आल्याने कामकाजावर परिणाम होणार नसल्याची माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली भागात बदलापूर कल्याण मार्गावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणेचा गाडा हाकला जातो. सोमवारी सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दस्त खोलीला आग लागली. याबाबत माहिती मिळताच कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या मांजर्ली अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी वा कुणीही जखमी झालेले नाही. मात्र दस्त खोलीतील कागदपत्रे जळून खाक झाली असल्याची प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे. ज्या खोलाीला आग लागली ती कार्यालयाच्या शेवटच्या बाजूला असून त्यामध्ये उपयोगी नसलेल्या जुने दस्तऐवज होते. कोणताही कर्मचारी या खोलीत कार्यरत नव्हता, असे सागंण्यात आले. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सर्व जुन्या दस्तऐवजांची माहिती संगणकीय प्रणालीतही संकलित केल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होणार नसल्याचेही प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.