कल्याण – येथील खडकपाडा भागातील साई पॅरेडाईज संकुलाच्या पाचव्या माळ्यावरील एका सदनिकेला बुधवारी दुपारी आग लागली. धुराचे लोट घराबाहेर पडू लागल्यानंतर रहिवाशांनी तातडीने ही माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे जवान येईपर्यंत इमारतीचे जिने धुराने भरून गेले होते. त्यावर मात करत जवानांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवरात्री विशेष: भाईंदरच्या तारोडी परिसरातील सुप्रसिद्ध धारावी देवी

आगीमध्ये घराचे स्वयंपाकघर, सभागृह आणि त्यामधील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा केल्याने आग इतर भागात पसरली नाही. अन्यथा इतर सदनिकांना आगीची झळ लागण्याची शक्यता होती. या इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून तळ मजल्याला जाण्यास सांगण्यात आले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा अंदाज साहाय्यक अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी व्यक्त केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out at house on fifth floor of building in kalyan zws