पालघर तालुक्यातील सफाळे येथील बाजारपेठेत रात्री आग लागल्याची घटना घडली. रात्री २.१५ च्या सुमरास या बाजारपेठेतील ३ दुकानांना आग लागली. या दुकांनांमध्ये दोन कपड्याची आणि एक हार्डवेअरच्या दुकानाचा समावेश आहे. आग लागल्यावर विरार वसई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाना पाचारण करण्यात आले. त्या बंबानी आगीवर नियंत्रण मिळविले असले, तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लगतच्या इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले असून या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

Story img Loader