भिवंडीत पेपरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. परिसरात सर्वत्र आगीचे लोळ पसरत असून ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु असून ती आटोक्यात येण्यात काही अडचणी येत आहेत. आगीचे स्वरुप पाहता जवळच्या इतर केंद्रातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात येत आहे. यामध्ये अद्याप किती हानी झाली ते सांगता येत नसल्याने काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पेपरचे गोडाऊन असल्याने ही आग अतिशय कमी वेळात वेगाने पसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in bhiwandi paper godown fire brigade
Show comments