साकेत रोड परिसरातील जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या जैवविविधता उद्यानात आग लागल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेत उद्यानातील बांबूच्या झाडांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकली नव्हती. साकेत रोड येथील राबोडी वाहतूक विभागाच्या पोलीस चौकीसमोर जैवविविधता उद्यान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> डोंबिवलीतील ‘रेरा’ घोटाळ्यातील वास्तुविशारदांना ‘ईडी’चा दणका; वास्तुविशारदांची माहिती दाखल करण्याचे संघटनेला आदेश

या उद्यानात मोठ्याप्रमाणात वृक्षसंपदा आहे. मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास येथील उद्यानामधून धुर येऊ लागला होता. याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल तसेच वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग विजविली. काही बांबूच्या झाडाचे यामध्ये नुकसान झाले आहे. आग लावली की लागली गेली याची माहिती मिळू शकली नव्हती.