ठाणे : शिळफाटा येथे सोमवारी सकाळी दोन गोदामांना आग लागल्याची घटना उघडकीस आली. गोदामांत पुठ्ठे आणि कापडी चिंध्या असल्याने आग विजविणे पथकांना कठीण जात होते. अखेर दोन तासांनंतर ही आग विजविणे शक्य झाले. या घटनेत दुर्घटना टळल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – डोंबिवलीत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला.

शिळफाटा येथील मुंब्रा-पनवेल रस्त्यालगत पुठ्ठे आणि कापडी चिंध्यांची गोदामे आहेत. सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास यातील दोन गोदामांना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही आग विजविण्यात आली. या घटनेत जीवितहानी टळली आहे.