ठाणे: शहरात रविवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी १५ ठिकाणी आग लागल्याची घटना उघडकीस आली असतानाच, त्यानंतर सोमवार आणि मंगळवार या दिवशीही आणखी २६ ठिकाणी आग लागल्याचे समोर आले आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, बुधवारी मध्यरात्री एका इमारतीच्या वाहनतळात लागलेल्या आगीमध्ये ११ दुचाकी जळून खाक झाल्या तर, तीन मोटारींचे नुकसान झाले आहे.

फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषण होते. तर, काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडतात. यंदा लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी निमित्ताने रविवारी पहाटेपासून शहरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. इमारतींमधील सदनिका, रस्त्यालगत असलेला कचरा तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे शहरात रविवारी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवसभरात १५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यापाठोपाठ, सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आणखी २६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सोमवारी १६ तर, मंगळवारी १० ठिकाणी आग लागली होती. यामध्ये बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे.

BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Massive fire breaks out at scrap warehouses in Mandala area
मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…

हेही वाचा… टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर लैंगिक अत्याचार

वसंतविहार, कोपरी, बाळकुम नाका, साठे नगर, उपवन, राबोडी, मुंब्रा, मुंब्रा रेतीबंदर दिवा आगासन रोड अशा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. तर, बुधवारी मध्यरात्री पाचपाखाडी येथील सरोवर दर्शन टाॅवरमधील वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत ११ दुचाकी पूर्णत: जळून खाक झाल्या आहेत. तर, तीन कारचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तसेच या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आगीच्या घटना कुठे घडल्या

वसंत विहार येथे ताडपत्रीला आग लागली होती, कोपरीतील फटाका मार्केट येथे भंगार सामानाला आग लागली होती, दिवा आगासन रोड येथे एका गॅलरीमध्ये आग लागली होती, बाळकुम येथील एका गॅरेजमध्ये आग लागली होती. दिवा पूर्व येथे एका मिटर बॅाक्स ला आग लागली होती. मुंब्रा येथील कौसा भागात कचऱ्याला आग लागली होती. साठे नगर येथे कचऱ्याला आग लागली होती. उपवन येथील कृष्णा टॅावरच्या मिटर बॅाक्सला आग लागली होती. दिवा डंपिग येथे रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. मुंब्रा येथील अमृत नगर भागातील प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याला आग लागली होती. राबोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आग लागली होती. अशाप्रकारे विविध ठिकाणी आग लागली असून यामध्ये सर्वाधिक आग कचऱ्याला लागल्याचे समोर आले आहे.

Story img Loader