ठाणे : भिवंडी येथील पडघा भागात शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमध्ये वास्तव्यास असलेले दोनजण शुक्रवारी रात्री पडघा येथील पच्छापूर गावाजवळ आले होते. त्याचवेळी एकाने त्यांच्या दिशेने पिस्तुलीने सहा गोळ्या झाडल्या.
जखमीपैकी एकाच्या मानेवर आणि तोंडाला गोळ्या लागल्या आहे. तर दुसऱ्याच्या पाठीवर दोन गोळ्या लागल्या आहेत. या दोघांना मुबंईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.