येथील माजिवडा परिसरात शुक्रवारी रात्री बांधकाम साहित्य पूरविणाऱ्या एका व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत व्यावसायिक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या गोळीबार प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>ठाणे : जादा परताव्याच्या आमिषाने २१ जणांची ४४ लाख रुपयांची फसवणूक

माजिवडा येथील गणेश वंदन या इमारतीत संदीप अडसूळ हे ४३ वर्षीय व्यावसायिक राहतात. बांधकाम साहित्य पुरविण्याचा त्यांच्या व्यवसाय आहे. संदीप अडसूळ हे शुक्रवारी रात्री आठ च्या सुमारास राहत्या घरी परतले. संदीप यांनी त्यांची दुचाकी इमारतीच्या आवारात उभी करून जिन्याकडे गेले असते त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींना त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर त्या व्यक्तीने तेथून पोबारा केला. तर या हल्ल्यात संदीप हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी कासारवडवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत असल्याची माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.