लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहापूर : येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या एक कामगारावर अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना शहापुरातील पंडित नाक्यावर शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.

महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील कामगार दिनेश चौधरी हे दुकान बंद करून निघाले असता, एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते फरार झाले, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली. या घटनेत चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना शहापुर उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढे हलविण्यात आले आहे.

आणखी वाचा-कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

या घटनेमुळे शहापुरात खळबळ उडाली असून पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान गोळीबार करणारे अनोळखी असून गोळीबाराचे कारणही समजू शकलेले नाही,