लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : शहरात जून २०२४ मध्ये प्रथमच होणारे गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेश आणि प्रदर्शन कोकण पदवीधर निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. हे अधिवेशन आता, २० ते २२ डिसेंबर या कालावधीत उपवन तलाव येथील मैदानात होणार आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात येणाऱ्या विविध समस्या आणि अडचणीबाबत चर्चा तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. ठाण्यात प्रथमच हे महाअधिवेशन भरणार असून या अधिवेशनाला सुमारे १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील ३४ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी, आजवर गृहनिर्माण संस्थांच्या अनेक समस्या सरकार दरबारी मांडून त्यांचे निरसन केले आहे. तरीही गृहनिर्माण संस्थांसाठी मोठया प्रमाणात कायद्यात तसेच नियम आणि उपविधीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे, त्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले. या अधिवेशनातील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी,अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत मतदानासाठी उभारलेल्या मंडपांचा वाहतुकीला अडथळा
या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या आणि स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्यात सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच, अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर, गृहनिर्माण संस्था संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील अधिवेशनात पारित केले जाणार आहेत. या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनने https://bit.ly/thanehousingmahaadhiveshan2024 ही लिंक उपलब्ध केली आहे. १५ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.