ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

ठाणे – बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आणि अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टानिर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व संबंधित विभागांना, मच्छिमारांना व नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील सुचनेपर्यंत ठाणे खाडीतील मासेमारी आणि प्रवासी बोट वाहतूक बंद करण्याच्या सूचनाही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी परदेशी यांनी सर्व स्थानिक यंत्रणा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळ तसेच अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासंदर्भात नागरिकांनी तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी प्राधिकरणाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. दुरध्वनी क्रमांक सुरु आहेत, याची खात्री करावी. आपत्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद द्यावा. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर तात्काळ परत बोलाविण्यात यावे. तर पुढील सूचनामिळेपर्यंत मासेमारीसाठी परवाना देण्यात येवू नये, तसेच मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात यावी. मासेमारी जेट्टींवर सूचनां फलक लावण्यात यावेत. बोटीमधून प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी. पुढील सूचनां मिळेपर्यंत प्रवासी वाहतूक थांबविण्यात यावी. अशा स्पष्ट सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.

PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
sand mafias are illegally extracting sand from ujani dam
उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
Loksatta viva Jungle Look From Sea Lover to Explorer Marine Explorer
जंगलबुक: समुद्रप्रेमी ते संशोधक

हेही वाचा >>>ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही

तसेच प्रवासी बोटीवर जीवनावश्यक लाईफ जॅकेटस्, बोयाज उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी, सर्व समुद्र किनाऱ्यावरील वॉटरस्पोर्टस उपक्रम थांबविण्यात यावेत, पर्यटकांना, नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा, चक्रीवादळामुळे झाडे पडल्यास ती तोडण्यासाठी कटर, झाडे हटविण्यासाठीची जेसीबी ही आवश्यक साधने तत्पर उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. त्याच बरोबर मोबाईल टॉवर पडल्यास पर्यायी संपर्क व्यवस्था उपलब्ध करावी, तसेच मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास टॉवरच्या ठिकाणी विद्युत जनरेटर उपलब्ध करावेत. विद्युत पुरवठा- झाडे पडणे, पोल पडणे यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होतो, अशावेळी योग्य मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध होईल, याचे नियोजन विद्युत वितरण कंपनीने करावे. रुग्णवाहिका, हॉस्पीटलमधील आपत्कालीन वैद्यकिय सुविधा तत्पर ठेवाव्यात. शासकीय रुग्णालयामधील वैद्यकिय अधिकारी संबंधित रुग्णालयांमध्ये उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यामध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच चक्रीवादळ, मौसमी पावसाच्या काळात झाडे पडल्यामुळे पाणी भरल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था, वाहतूक पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक, झाड हटविण्यासाठी साहित्य तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. ज्याविभागाच्या अधिकारक्षेत्रात रस्ता, पूल येतो, त्या विभागांनी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. याची संबंधित विभागाची सर्वस्वी जबाबदारी राहील.घडलेल्या घटनांचा अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास सादर करावा, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>ठाणे पालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापुर्वीच मिळाली पुस्तके; आयुक्तांच्या दट्यामुळेच हे घडल्याची चर्चा

सखल भागात अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता राहील. त्यादृष्टीने योग्य त्या उपाय योजना कराव्यात. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी निवडलेल्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. चक्रीवादळ व मान्सून पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पट्टीचे पोहचणारे यांची व्यवस्था तात्काळ करणेत यावी. त्याबाबत अद्ययावत यादी करुन प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच चक्रीवादळ व मान्सुन कालावधीत नोंदणीकृत मच्छिमार संघटना यांचेशी समन्वय ठेवून आवश्यक कारवाई करावी. चक्रीवादळ व मान्सुन कालावधीत पुरपरिस्थिती निर्माण होवुन रेल्वे रुळांवर पाणी आल्यामूळे किंवा वाहतुक विस्कळीत होत असल्यास त्याबाबत आवश्यक उपाययोजना प्राधान्याने कराव्यात तसेच जिल्हा प्रशासनाशी आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Story img Loader