लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजुकडील छताला पंखे नसल्याने प्रवासी घामाघामू होत होते. या रेल्वे स्थानकातील फलाटाच्या एका भागाला छत नाही. तेथील प्रवासी सावलीसाठी छताखाली येऊन थांबत होते. त्यांनाही फलाट क्रमांक पाचवर पंखे नसल्याने गारव्याचा आनंद घेत येत नव्हता.

‘लोकसत्ता’ने गेल्या आठवड्यात याप्रकरणी वृत्त (डोंबिवली स्थानकात फलाटावर पंखे नसल्याने प्रवासी घामाघूम) प्रसिध्द करताच रेल्वे प्रशासनाने त्याची तातडीने गंभीर दखल घेऊन फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजुला पंखे नसलेल्या भागात चार पंखे बसविले आहेत. या पंख्यांमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

आणखी वाचा- अंगाची लाहीलाही होताच गारेगार लोकलमधून प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड, टिटवाळा ते ठाणे फुकट्यांची घुसखोरी

डोंबिवलीत फलाट क्रमांक पाचवर नवीन नियमाप्रमाणे लोकल तीन डबे सीएसएमटीच्या दिशेने थांबते. पुढील भागात छत नाही. त्यामुळे प्रवाशांना छताची सावली असलेल्या भागात येऊन थांबावे लागते. लोकल आली की मग धावत जाऊन डबा पकडावा लागतो. यामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक दमछाक होत होती. त्यामुळे छत नसलेल्या भागातील छताचे काम रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी लता अरगडे, शैलेश राऊत यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर पंखे नसल्याचा विषय मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या बरोबरच्या बैठकीत उपस्थित केला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five fans on platform number five of dombivli railway station mrj
Show comments