कल्याण- कल्याण पश्चिमेतील डाॅ. बाबासाहेबआंबेडकर रस्त्यावरील एका सोसायटीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांनी गेल्या चार दिवसाच्या कालावधीत वेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. या प्रकाराने शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक सर्वाधिक हैराण आहेत.
डाॅ. आंबेडकर रस्त्यावरील सनराईज गॅलेक्सी सोसायटीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा मागील काही दिवसांपासून वावर वाढला आहे. सोसायटीतील रहिवासी, समोरील रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या अंगावर ही भटकी कुत्री धाऊन जात आहेत. गेल्या तीन ते चार दिवसाच्या कालावधीत पाच जणांना या कुत्र्यांनी जखमी करुन चावा घेतला आहे. यामध्ये तीन जण हे शाळेतील विद्यार्थी आहेत.अर्णव अजय गायकवाड, झेबा रईस खान, दक्ष वर्मा या शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर अजय गायकवाड हे जखमी झाले आहेत.
हेही वाचा >>>भाईंदरच्या सहा गावांचा पर्यटन विकास कागदावरच; निधी उपलब्ध असूनही एमएमआरडीएचे अपयश
हेही वाचा >>>घोडबंदर मार्गावर तीन महिने अवजड वाहतुकीला बंदी? ‘सार्वजनिक बांधकाम’चा पोलिसांना प्रस्ताव
सनराईज गॅलेक्सी सोसायटीत रहिवाशांबरोबर इतर विक्रेते रहिवाशांच्या वस्तू घेऊन येत असतात. त्यांनी ही या भटक्या कुत्र्यांचा धसका घेतला आहे.एक कुत्रा नागरिकाच्या अंगावर धावला की इतर सात ते आठ कुत्री त्या नागरिकाच्या अंगावर एकावेळी धाऊन जातात. अचानक हल्ला झाल्याने नागरिक घाबरुन पळून जातो. त्याचा पाठलाग करत हे भटके कुत्रे त्याला चावा घेत आहेत. या सोसायटीतील रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना पत्र लिहिले आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत भटके कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली जायची. हा प्रकार मागील तीन ते चार वर्षापासून पूर्ण थंडावला आहे.
पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात भटकी कुत्री चावली म्हणून इंजेक्शन घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.