ठाणे: वागळे इस्टेट येथील रोड नं. ३४ भागात देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये झालेल्या राड्यात फटाके पेटविल्याने आणि दगडफेक झाल्याने पाचजण जखमी झाले. या प्रकरणात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वागळे इस्टेट येथील हनुमान नगर भागात शिवसाई क्रीडा मंडळ आणि हनुमान नगर रहीवासी कमिटी हे दोन मंडळ आहेत. या दोन्ही मंडळांकडून वेग वेगळ्या ठिकाणी नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. रविवारी रात्री शिवसाई क्रीडा मंडळाच्या मंडपा जवळ हनुमान नगर रहिवासी कमिटीच्या देवीची मिरवणूक आली असता कोणीतरी मंडपा जवळ फटाके फोडले. या घटनेवरून दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

हेही वाचा… पडघा गोळीबार प्रकरण उघडकीस; कर्ज फेडण्यासाठी पोलिसाकडून चोरीच्या उद्देशाने गोळीबार

दरम्यान, पुन्हा कोणीतरी फटाके पेटविले. या फटाक्यांमुळे शिवसाई क्रीडा मंडळातील चारजण भाजले गेले. राडा सुरू असताना दगडफेकही झाली. या दगडफेकीत एकजण जखमी झाले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five people were injured due to stone throwing and firecrackers in two mandals during the goddess aagman procession in wagle estate thane dvr
Show comments