ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात पाच वाहनांची एकमेकांना धडक बसली. या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. भरत चव्हाण (४७) आणि दीपक सिंह (३५) अशी जखमींची नावे आहेत. दोन टेम्पो, मोटार, ट्रक आणि डम्पर ही वाहने एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा >>> रुंंदीकरण केलेल्या ठाण्यातील रेल्वे फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे, लोकलमध्ये चढताना प्रवाशांची कसरत

debris use for filling in development works in vasai virar
वसई: भरावासाठी मातीऐवजी राडारोडा; भूमाफियांकडून महसूल परवान्याला बगल
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Navapada, illegal building at Navapada,
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी
Vasai, Pedestrian bridge work, National Highway,
वसई : राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पुलांची कामे अंतिम टप्प्यात, रस्ते ओलांडून होणारे अपघात रोखणार
Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच
Ten accused who blocked vehicles on the highway and committed robberies arrested in Chhattisgarh
वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या
municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन येथून वाहने जात होती. अचानक दोन टम्पो, ट्रक, डम्पर आणि मोटार अशी पाच वाहनांची एकमेकांना पाठोपाठ धडकली. या अपघातामुळे मोटारीचा चुराडा झाला आहे. तर इतर वाहनांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात मोटार चालक दीपक सिंह यांच्या डोक्याला, पायाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच एका टेम्पोमधील चालक भरत चव्हाण यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला देखील दुखापत झाली. या अपघातानंतर जखमींना स्थानिकांनी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कॅडबरी जंक्शन ते तीन हात नाका पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. वाहतुक पोलीस आणि इतर बचाव पथकांनी तीन क्रेनच्या साहाय्याने येथील अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतरही काहीकाळ वाहतुक कोंडी कायम होती. अपघातामुळे दुपारी नाशिक, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.