ठाणे : उपनगरीय रेल्वेगाडीत अपंगाच्या डब्यामध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या एका प्रवाशाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपनगरीय रेल्वेगाडीच्या अपंगाच्या डब्यातून प्रवासी प्रवास करत होते. रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात आली असता, एका प्रवाशाने दुसऱ्या एका प्रवेशाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतले. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.