डोंबिवली- आतापर्यंत भूमाफिया सरकारी, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर बेकायदा इमारती बांधून तेथील सदनिकांची बेमालूमपणे विक्री करत होते. आता डोंबिवलीत भूमाफियांनी नवीनच प्रकार शोधून काढला आहे. इमारती बांधून झाल्यानंतर त्या इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकी जवळ सदनिका बांधण्याचा नवा उद्योग माफियांनी सुरू केला आहे. हा प्रकार पाहून डोंबिवलीतील नागरिक हैराण आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसी विको नाक्यावरील कोंडीने रिजन्सी अनंतमधील रहिवासी हैराण

News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी
Five shops were broken, Pune, shops looted,
पुणे : पाच दुकाने फोडून दीड लाख लंपास

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील श्री सदगुरू दर्शन इमारतीच्या गच्चीवर भूमाफियाने सदनिकांची उभारणी केली आहे. अशाच प्रकारची सदनिका ही इमारत उभारणाऱ्या माफियांनी दोन वर्षापूर्वी बांधली होती. त्याची तक्रार पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्त भारत पवार, अधीक्षक दापोडकर यांच्याकडे होताच त्यांनी तात्काळ गच्चीवरील सदनिका जमीनदोस्त केल्या होत्या. माफियाने पुन्हा गच्चीवरील तोडलेल्या सदनिकेच्या जागेवर ह प्रभाग साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण पथकाला अंधारात ठेऊन गच्चीवर सदनिकांची उभारणी केली आहे. या सदनिकेच्या चारही बाजुने प्रखर झोताचे दिवे, वातानुकूलित सयंत्र, आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे. गच्चीवरील या सदनिका अनेकांचे आकर्षण झाले आहे. इमारतीच्या गच्चीची जागा ही इमारतीमधील रहिवाशांचा वापर, पावसाचे पाणी वाहून जाणे यासाठी प्रस्तावित असते.

हेही वाचा >>> पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

श्री सदगुरू दर्शन बेकायदा इमारतीवर ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडून कारवाई नाहीच, पण गच्चीवरील बेकायदा सदनिकेची तक्रार करुनही त्याच्यावर कारवाई न केल्याने एका जागरुक नागरिकाने यासंदर्भात ह प्रभाग साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना निलंबित करण्याची मागणी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे केली आहे. गच्चीवरील सदनिकेची तक्रार होताच माफियाने या सदनिकेला पोती, हिरव्या जाळीने बंदिस्त करुन ठेवले आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या बांधकामाची पाहणी करुन कारवाई करतो, असे साहाय्यक आयुक्त रोकडे यांनीही कळवुनही कारवाई न केल्याने ते या बांधकामाला पाठीशी घालत आहेत. तसेच त्यांनी गोपी चौकात सेंट मेरी शाळा परिसरात एका बेकायदा इमारतीवर जुजुबी कारवाई करुन त्या बांधकामाला पाठीशी घातले आहे. नवापाडातील पदपथावरील गाळ्यांना अभय दिले आहे. साहाय्यक आयुक्त रोकडे यांची बेकायदा बांधकामांना पाठीशी घालण्याची कृती अयोग्य असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जागरुक रहिवाशाने आयुक्तांकडे केली आहे. डोंबिवलीत परिमंडळ उपायुक्त असुनही माफिया बेकायदा बांधकामे करण्याची हिम्मत करत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

हेही वाचा >>> विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकामांची ठाणे गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. याप्रकरणात काही पालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता असताना अधिकारी बेकायदा बांधकामांना पाठबळ देणे सोडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशाप्रकारे कोणी बेकायदा बांधकामे केले असेल तर साहाय्यक आयुक्तांना त्याची पाहणी करुन ते जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले जातील.

सुधाकर जगताप उपायुक्त अतिक्रमण नियंत्रण

गच्चीवर कोणी सदनिका बांधल्या असतील तर संबंधित इमारतीची पाहणी करुन त्यांना नोटिस काढण्याची प्रक्रिया करतो. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल.

संदीप रोकडे साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली