येत्या शनिवार, रविवारी ठाण्यात विशेष कार्यक्रम

खरेदीबरोबरच बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा रिजन्सी ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलची रंगत वाढली असून खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभत आहे. शॉपिग फेस्टिव्हलच्या निमित्ताने महोत्सवात सहभागी झालेल्या दुकांनाना सिने कलाकार भेट देत आहेत. त्यासोबतच लोकसत्तातर्फे शनिवार, ९ फेब्रुवारी आणि रविवार, १० फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फोक मस्ती हा तरुणांचा बँड कार्यक्रम सादर करणार आहे, तर रविवारी जीवनगाणी हा कार्यक्रम होणार आहे.

फोक मस्ती हा बँड भारतीय पारंपारिक संगीत आणि पाश्चात्त्य संगीताचा अनोखा मिलाप साधून गाणी सादर करतो. तसेच या बँडमध्ये सामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडींचे गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. फोक मस्ती बँडमध्ये विपुल पांचाल, समाधान गुलदगडे, रोशन आडे, अमय चोपा आणि प्रिन्स मँगन हे तरुण कला सादर करणार आहेत. रविवारी जीवनगाणी कार्यक्रमात जुन्या आणि नव्या गाण्यांची मैफल होणार आहे. या कार्यक्रमात चिंतामणी सोहनी आणि अर्पणा नागरगट्टे हे गायन करणार असून कुणाल रेगे निवेदन करणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या आकर्षक खेळांत सहभाग घेऊन ठाणेकरांना गिफ्ट कूपन जिंकण्याची संधीही ठाणेकरांना मिळणार आहे.

आकर्षक बक्षिसे

येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरूअसणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. या भाग्यवान विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. तर महोत्सवाच्या शेवटी एकत्रित सोडतीद्वारे दोन भाग्यवंतांची निवड करून पहिल्या विजेत्यास कार व दुसऱ्या विजेत्यास सहलीचे पॅकेज अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

* ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळले जातील.

* ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

* या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

कधी?

शनिवार, ९ फेब्रुवारी आणि रविवार, १० फेब्रुवारी,

वेळ – सायंकाळी ६.३० ते ९

कुठे?

गणेश विसर्जन घाट, साईकृपा हॉटेलसमोर, मासुंदा तलाव, ठाणे (प).

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिपटॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, क्रिष्णा स्वीट आणि लिनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँन्डमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रह्मविद्या हे हिलिंग पार्टनर आहेत.

Story img Loader