कल्याण येथील पूर्व भागातील चक्कीनाका भागात विधानसभा निवडणूक भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी एक लाख १० हजार रूपयांची विदेशी दारू एका वाहनातून जप्त केली. या दारू खरेदी, विक्रीच्या पावत्या आणि याविषयी सविस्तर माहिती वाहनातील इसम देऊ शकला नाही. त्यामुळे भरारी पथकाने हे वाहन अधिकच्या चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.

निवडणूक विभागाचे भरारी पथक कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शनिवारी संध्याकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. यावेळी या चौकातून एक मोटार वेगाने जात होती. पथकाने ही मोटार अडवली. या मोटारीत बडवायझर कंपनीच्या ३८ इंचाच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. वाहनातील इसमाकडे पथकाने या विदेशी दारू खरेदी आणि विक्रीच्या पावत्या मागितल्या. त्याची माहिती वाहन चालकासह त्याचा साथीदार देऊ शकला नाही.

passenger was robbed by thieves on the skywalk of Kalyan railway station
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
thane police
डोंबिवलीतील दोन जण पिस्तुलसह कल्याणमध्ये अटक
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Crimes against three persons for consuming ganja in public places in Kalyan
कल्याणमध्ये सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे

हेही वाचा >>>कल्याण पट्ट्यातील ठाकरेंचे उमेदवार ठरले, शिंदेचे ‘आस्ते कदम’

निवडणूक कामात या विदेशी दारूचा गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने पथकाने ही माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. डी. आव्हाड यांना दिली. हवालदार वाय. के. गायकवाड, पंच सुनील कशिवले, रोहिदास डोक यांच्या उपस्थितीत या विदेशी दारूसह वाहनाचा पंचनामा करण्यात आला. ही वाहने उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात निवडणूक भरारी पथकाने अधिकच्या चौकशीसाठी दिली.

ही विदेशी दारू मोटारीतून वहनाचे काम डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील संतोष किट्टना शेट्टी (४०) हे करत होते.

(कल्याणमध्ये निवडणूक भरारी पथकाकडून विदेशी दारू जप्त.)