कल्याण – कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात गेल्या वर्षी मलंग गड जंगल पट्ट्यातून नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याने मनोहर गायकवाड या रहिवाशावर हल्ला करून त्यास गंभीररित्या जखमी केले होते. या जखमीला वन विभागाने एक लाख २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य गुरुवारी केले आहे.

हेही वाचा – ठाण्यात मातीचा ढिगारा कोसळून दोघांचा मृत्यू, इमारतीच्या पायाभरणीच्या कामादरम्यान घडली घटना

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Gadkari alleged that officials of forest department responsible for stopping development of gadchiroli district
गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : नितीन गडकरी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

हेही वाचा – शिवसेनेचे माजी नगरसवेक संजय भोईर यांना अटक

गेल्या वर्षी चिंचपाडा भागातील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने चांगुणा चाळ परिसरात घुसून तेथून जात असलेल्या मनोहर गायकवाड यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्थानिक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मनोहर यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. खा. शिदे, महेश गायकवाड यांनी वन विभागाकडे मागील पाच महिन्यांच्या कालावधीत पाठपुरावा केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल तपासून मनोहर यांना सव्वा लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला. खा. डाॅ. शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनोहर गायकवाड यांना आर्थिक मदत देण्यात आली.