लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे – भाजपने दिवा शहराध्यक्ष पदावरून हटवल्याने नाराज असलेल्या रोहित मुंडे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता. या पाठोपाठ आता दिवा भाजपच्या माजी महिला अध्यक्ष ज्योती पाटील यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपला दिव्यात पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ज्योती पाटील यांच्यासह मनसेच्या महिला विभाग अध्यक्षा मयुरी तेजस पोरजी यांनी देखील शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. यातूनच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षांमध्ये प्रवेश होताना दिसून येत आहे. भाजपचे माजी दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांना भाजपने पदावरून दूर केले होते. यामुळे नाराज रोहिदास मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेच्या ठाकरे गटाची मशाल हाती घेतली होती. रोहिदास मुंडे यांच्या पक्षप्रवेशाने दिव्यात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात असतानाच त्यापाठोपाठ आता दिवा भाजपच्या माझी महिला अध्यक्ष ज्योती पाटील यांनी देखील आपल्या समर्थकांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात शनिवारी जाहीर प्रवेश केला.

आणखी वाचा-कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक बदल, स्मार्ट सिटी कामासाठी वाहतुक पर्यायी मार्ग वळवली

मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हे उपस्थित होते. पक्षाच्या माध्यमातून तसेच तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नावर ज्योती पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका घेत महिलांच्या समस्या मांडल्या होत्या. अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचे ही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. ज्योती पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला विभाग अध्यक्ष मयुरी तेजस फोरजी यांनी देखील त्यांच्या काही समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे सद्यस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाची ताकद काही अंशी या पक्ष प्रवेशामुळे वाढली असल्याचे दिसून येत आहे.