डोंबिवली – शिवसेनेतील जुने मित्र आणि पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून स्वतंत्र बाण्याने निवडणुका लढविणारे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची मंगळवारी डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट झाली. या भेटीतून विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर डोंबिवली विधानसभेची निवडणूक ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, कल्याण पूर्वेतील विधानसभेची निवडणूक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी ताकदीने लढवली. या दोन्ही उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांविरुध्द लढत दिली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवार भाजप कार्यकर्त्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द निवडणूक लढवली. माजी आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील राजकीय, व्यावसायिक वाद, त्यानंतर महेश गायकवाड यांच्यावर माजी आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार. या इर्षेतून महेश गायकवाड यांनी माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या कुटुंबियांच्या विरुध्द निवडणूक रिंगणात उतरणार असा पण केला होता. कल्याण पूर्वेत आपला समर्थक गट तयार करून महेश यांनी भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांना लढत दिली.पराभव होऊनही महेश गायकवाड पालिका निवडणुका समोर ठेऊन नव्या जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी

हेही वाचा >>>तिसऱ्या चौथ्या मार्गिकेतील महत्वाच्या टप्प्याला गती, मार्गिकेतील लहान मोठ्या पुलांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर

डोंबिवलीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरुध्द लढत दिली. शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्याने निवडणुकीच्या तोंडावर दीपेश यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तेथून उमेदवारी घेऊन त्यांनी महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरुध्द निवडणूक लढवली. दीपेश म्हात्रे यांनीही पराभवानंतरही नागरी विकासाची कामे मार्गी लागावीत म्हणून अधिकारी, लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या भेटीगाठीमधून ते आता पालिका आणि पुढची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

एकेकाळी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक, पण दोघेही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर पडले. स्वतंत्र लढले. या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड यांच्या मंगळवारच्या भेटीतून ते येत्या काळात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आखणी आणि त्यावर चर्चा केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>>घरगुती खानावळ, पोळी भाजी केंद्र दुहेरी आर्थिक कोंडीत, भाज्यांचे वाढत्या दरामुळे खर्चात वाढ

महेश गायकवाड हे आमचे जुने मित्र आहेत. २००९ ला माजी महापौर पुंडलिक म्हात्रे कल्याण पूर्वेत विधानसभा निवडणूक रिंगणात होते. तेव्हापासून आमची घट्ट मैत्री आहे. आमच्या दोघांच्या भेटीत सामाजिक, शहर विकासाचे विकास, नागरी समस्या या विषयावर आणि याविषयी पुढे काय करता येईल यावर चर्चा केली आहे. दोघांच्या समन्वयातून नक्कीच लोकहिताची, नागरी विकासाची कामे मार्गी लागतील असा आम्हाला विश्वास आहे.-दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक, ठाकरे गट.

Story img Loader