School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदारावर आगपाखड केली आहे. म्हात्रे यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आज सकाळी साडे सहा वाजता बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काही आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद केली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून पत्रकारांनीही हा विषय लावून धरला आहे.

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Three arrested in rape molestation cases
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

हेही वाचा >>>Badlapur School Case: “…तर असे प्रकार घडणार नाहीत”, बदलापूर प्रकरणावर विधानपरिषद उपसभापतींनी मांडली महत्त्वाची भूमिका!

याच कारणावरून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांची एका महिला बातमीदाराशी बोलताना जीभ घरसली. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत म्हात्रे यांनी महिला बातमीदारावर आगपाखड केली. अशाप्रकारची भाषा वापरणाऱ्या म्हात्रे यांचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून जिल्ह्यातील पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आहेत. पण तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्याच पक्षातील राजकारणी मंडळी जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता. नक्की काय झाले याची माहिती घ्या, असे आवाहन मी पत्रकारांना केले. मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. – वामन म्हात्रे, शहरप्रमुख, शिवसेना.

Story img Loader