ठाणे : ठाण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. ठाणे महापालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे येथील खोपट परिसरातून अशोक राऊळ हे निवडून येत होते. ते १९८६ मध्ये ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवड आले. पुढे १९९१-९२ या काळात ते ठाण्याचे महापौर झाले. १९८६ ते २०२२ या काळात ते सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. शांत, संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. सुरूवातीला ते काँग्रेस पक्षात होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांची साथ दिली. यानंतर ते राष्ट्रवादी पक्षातून नगरसेवक म्हणून निवडुन आले. २०१७ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्यांचे रविवारी निधन झाले. वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी सकाळी परेरानगर येथील घरी जाऊन राऊळ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली. ठाण्यातील जवाहरबाग स्म्शानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले तसेच विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.