अंबरनाथ: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, याची चीड शिवसैनिकांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्येही निर्माण झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचा ठाम निश्चय आपण केला आहे. भाजपाला विजयाची खात्री नाही. म्हणूनच त्यांनी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले. ते अंबरनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदेंकडून भाजपा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

येत्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात विविध ठिकाणी ५ राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. या ठिकाणी विजयी होण्याची शक्यता भाजपाला नाही. पुढील वर्षी लोकसभेची मुदत देखील संपत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभा निवडणूक घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले. अंबरनाथ येथे आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. निवडणुकांसाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्याचा दावा अनंत गिते यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा >>> रात्रंदिवस काम करुन डोंबिवली-कल्याणमधील खड्डे तीन दिवसात भरा; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, याची चीड पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांप्रमाणे नागरिकांमध्येही निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचा असा ठाम निश्चय झाला असून कोकणवासीयांनी देखील तसा निर्धार केल्याचे यावेळी गिते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. पराभव होण्याच्या भीतीने सध्याचे शिंदे सरकार कोणत्याही निवडणुका घेण्यास तयार नसल्याचा आरोप गिते यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former minister anant geete attack on modi government over one nation one election zws
Show comments