कल्याण: मुरबाड विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार दिगंबर नारायण विशे यांचे गुरुवारी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी मुरबाड विधानसभेचे नेतृत्व केले होते. दिगंबर विशे हे शिक्षक होते. शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख होती. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख होती.
शेतीच्या आवडीमुळे शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन पातळीवर अनेक लढे उभारले. युती सरकारच्या काळात युरोपमधील अभ्यास दौऱ्यात विशे यांचा सहभाग होता. इतर मागासवर्गियांचे शिक्षण, नोकरी मधील आरक्षण टिकावे म्हणून ते राष्ट्रीय ओबीसी महासंघात सक्रिय होते. कुणबी सेनेत त्यांनी काही काळ काम केले. आता त्यांनी वायएसआर पक्षाचे काम सुरू केले होते.