शिक्षिकेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन रबाळे पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला अटक केली. रामआशीष यादव असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित महिलेचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो या महिलेला ब्लॅकमेल करत होता. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिला नवी मुंबईतील एका शाळेत शिक्षिका आहे. रामआशीष यादव आपले लैंगिक शोषण करत होता. २०१७ मध्ये आरोपीने आपले फोटो काढले व व्हिडिओ बनवला होता. त्यावरुन तो ब्लॅकमेल करायचा असा आरोप पीडित महिलेने केल्याची माहिती रबाळे पोलिसांनी दिली. यावर्षी जानेवारी महिन्यापासून आरोपीने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली.

अखेर या महिलेने हिम्मत दाखवून पोलीस स्थानक गाठले व आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. रामआशीष यादवचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून डाटा मिळवण्यासाठी तो फोन कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जाणार आहे. आरोपीने कंटेट डिलीट केला असेल तरी आम्ही त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करु असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वाशी कोर्टाने रामआशीष यादवला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former ncp corporator arrested for raping school teacher