कल्याण : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू, प्राध्यापक अशोक प्रधान यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभना प्रधान, मुलगा समीर, विवाहित मुली सोनाली आणि प्रणाली प्रधान, नातवंडे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निगर्वी, मृदुभाषी, साधेपणा असे प्रा. प्रधान यांचे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना आणून त्या राबविण्याचे, त्याला वेगळे आयाम देण्याचे काम प्रा. प्रधान यांनी केले. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. तेथे त्यांनी प्राध्यापक ते प्राचार्य असा प्रवास केला. मुंबई विद्यापीठात प्र-कुलगुरू पद त्यांनी भूषविले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former vice chancellor prof ashok pradhan passed away kalyan news amy