कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नराजकीय दुकानदारीची चर्चा कायम रंगली असताना भाजपच्या एका माजी नगरसेविकेने पालिका मुख्यालयात चक्क दुकानच थाटले आहे. मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये नगरसेविकेने पालिका आवारात इतरत्र ‘जागा’ न मिळल्याने केबिनचा ताबा घेतला आहे. याबद्दल तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता त्याला जुमानलेले नाही.
कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची जरब अद्याप बसली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माघी गणेशोत्सव काळात नर्तिकांवर नोटा उधळण्याचे प्रकरण ताजे असताना भाजपच्या माजी नगरसेविका शुभांगी दिवटे यांनी खासगी उत्पादन खपवण्यासाठी सुरक्षारक्षकांसाठीची केबिन वापरण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सुरक्षारक्षकांनी आवाज उठवला असला तरी त्याला दिवटे यांनी जुमानलेले नाही.
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात माघी गणेशोत्सवाच्या दिवसांत एका खासगी कंपनीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणीचा स्टॉल लावण्यात आला होता. पालिका कर्मचाऱ्यांची आणि गणेश दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी या कंपनीने केली होती. त्यानंतर गुरुवार, ५ फेब्रुवारीला या कंपनीचे प्रतिनिधी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपले उत्पादन विकत घेण्यासाठी आग्रह करत होते. या प्रतिनिधींना बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी चक्क सुरक्षारक्षकांच्या कार्यालयाचाच ताबा घेतला. त्यातील एक प्रतिनिधी भाजपच्या माजी नगरसेविका दिवटे आहेत. त्यांनी तर चक्क सुरक्षारक्षकांच्या खुर्चीचाच ताबा घेतला होता. याविषयी सुरक्षारक्षकांनी हटकले तरी त्यांना दिवटे यांनी दबाव टाकल्याने ते गप्प बसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा