कल्याण येथील टिळक चौकातील प्रसिद्ध खिडकी वडा या खाद्य वस्तूचे उत्पादक, संस्थापक यशवंत वझे यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खिडकी वडा ही नाममुद्रा प्रसिद्ध करण्यात यशवंत वझे यांचा मोलाचा वाटा होता. रेल्वेची नोकरी सांभाळून घरी आल्यानंतर यशवंत वझे टिळक चौकातील आपल्या घराच्या खिडकीत बसून संध्याकाळच्या वेळेत वडा विक्री करत असत. या चवदार वड्याकडे सगळ्यांची पावले वळली.

हेही वाचा >>>कल्याण: कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे आरोप

वेगळ्या भागातून नागरिक खिडकी वड्याचा आस्वाद घेण्यासाठी कल्याणमध्ये येत होते. बदलत्या काळानुसार खिडकी वड्याला कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न वझे यांनी केला. खिडकी वड्याबरोबर कोथिंबीर वडीदेखील प्रसिद्ध झाली. आताही खिडकी वडा खाण्यासाठी सकाळपासून खवय्यांची गर्दी असते. अनेक वर्षांपूर्वीची खिडकी वड्याची चवदार लज्जत आजही कायम आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Founder of khidki wada yashwant vaze passed away kalyan amy