ठाणे : ठाणे आणि भिवंडी मतदार संघातून सोमवारी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात ठाण्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार राजन विचारे, ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे, भिवंडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे, भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघासाठी ७७ नामनिर्देशनपत्राचे वितरण झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदार संघ आहेत. यामध्ये ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी ठाणे आणि भिवंडी मतदार संघातून सोमवारी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघासाठी ७७ नामनिर्देशनपत्राचे वितरण झाले आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे आणि ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, २१ नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये अपक्ष १०, दिल्ली जनता पार्टी ३, लोकराज्य पक्ष १, हिंदू समाज पार्टी ३, धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंच १,बहुजन समाज पार्टी २, भारतीय राष्ट्रवादी पार्टी १ यांचा समावेश आहे.
हेही वाचा…लोकलमधून पडून डोंंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू
कल्याण लोकसभा मतदार संघात १९ इच्छूक उमेदवारांनी २८ नामनिर्देशनपत्र घेतली आहेत. यामध्ये अपक्ष १२, बहुजन मुक्ती पार्टी १, कामगार किसान पार्टी १, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, संयुक्त भारत पक्ष १, वंचित बहुजन आघाडी ४, दिल्ली जनता पार्टी ३, संघर्ष सेना १, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी १ यांचा समावेश आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा समावेश आहे. एकूण ८ जण २८ नामनिर्देश अर्ज नेले आहेत. त्यात अपक्ष ११, एम आय एम ५, बहुजन महापर्टी १, धनवान भारत पार्टी ३, बहुजन विकास आघाडी पार्टी २, भारतीय मानवता पार्टी २, स्वाभिमानी रिपब्लिक पार्टी २, अमन समाज पार्टी २ यांचा समावेश आहे.