डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर दिसू लागल्या तशा काठावर बसून असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ यांच्या पक्षातील चार नगरसेवक आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत वर्षा निवासस्थानी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात जल्लोषात प्रवेश केला.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिकेतील चार नगरसेवक ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी डोंबिवलीत

shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

गेल्या तीन महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थकांना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात आणण्याचा सपाटा खा. डाॅ. शिंदे यांनी लावला आहे. यापूर्वी नऊ नगरसेवकांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पक्षातील अयाराम नगरसेवकांची एकूण संख्या बारा झाली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहर, कल्याण ग्रामीण भागातील अधिकाधिक मूळ शिवसैनिक ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात आणण्याची व्यूहरचना शिंदे गटातून आखण्यात आली आहे.

हेही वाचा >>>कल्याण : कल्याण मधील ज्येष्ठ नागरिकाची माल वाहतूक सेवा कंपनीकडून फसवणूक; केरळमध्ये घरगुती सामान नेतो सांगून खंडणीची मागणी

यासाठी स्थानिक पातळीवर अलीकडेच डोंबिवलीत दाखल झालेले नगरसेवक महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, युवा संघटक दीपेश म्हात्रे,त जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे सक्रिय आहेत.

दाखल नगरसेवक
योगेश म्हात्रे, पूजा म्हात्रे, काँग्रेसचे दत्ता गिरी, गोरखनाथ जाधव. याशिवाय ठाकरे समर्थक उपशहर संघटक संजीव ताम्हाणे, युवा सेना तालुका प्रमुख मुकेश भोईर यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>करोना काळात मृत पावलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेतील २१ मृत कामगारांच्या वारसांसाठी १० कोटी ५० लाखाचा निधी

डोंबिवलीत नवे पदाधिकारी
शरद गंभीरराव-सहसंपर्कप्रमुख, संतोष चव्हाण-डोंबिवली विधानसभा प्रमुख, उपशहरप्रमुख-संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, रणजित जोशी, अमित बनसोडे, गजानन व्यापारी, सुनील भोसले, राजेश मुणगेकर, दीपक भोसले, उपशहर संघटक- अण्णा राणे, सुदाम जाधव, संतोष तळाशीलकर, प्रकाश माने-कार्यालय प्रमुख, सागर बापट-सहकार्यालय प्रमुख, डोंबिवली मध्यवर्ति शहर शाखेचे जागा मालक जितेन पाटील यांच्यावर शहर समन्वयक पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

कल्याण ग्रामीण पदाधिकारी
कल्याण तालुका संपर्कप्रमुख-रमेश म्हात्रे, तालुका प्रमुख महेश पाटील, अर्जुन पाटील-तालुका संघटक, बंडू पाटील-सचिव, नितीन पाटील-संघटक, उपतालुका प्रमुख-गजानन पाटील, विकास देसले, उमेश पाटील, रवी म्हात्रे, विलास भोईर, राहुल गणपुले, गणेश जेपाल, उपकार्यालय प्रमुख-धर्मराज शिंदे, सहकार्यालय प्रमुख-सुनील मालणकर.जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पदाधिकाऱ्यांची नावे बुधवारी डोंबिवलीत जाहीर केली.

हेही वाचा >>>ठाणे: रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू केले नाही म्हणून कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

मुख्यमंत्री डोंबिवलीत
येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत येणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे, असे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ति ठिकाणची मोक्याची शाखा ताब्यात आल्यामुळे शिंदे गटात आनंद आहे. या शाखेच्या नुतनीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. नुतनीकरण करण्यात आलेल्या या शाखेचे नव्याने उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी वर्तवली.

Story img Loader