ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापुर्वी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविले होते. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी रस्त्यावर इतरत्र पसरल्याने त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या १४ दिवसांत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत चारशेने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, २ हजार ६८ पैकी १ हजार ९०८ खड्डे बुजविण्यात आल्याने केवळ १६० खड्डेच शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला. या दाव्यापेक्षा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< महाराष्ट्रात झालेल्या फसवणुकीचा सत्तांतराने बदला घेतला; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची स्पष्टोक्ती

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडतात. या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासन टिकेचे धनी ठरते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने यंदा पावसाळ्यापुर्वीच रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. त्यात शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या प्राधिकरणांनाची पालिकेने बैठक घेऊन रस्ते दुरुस्ती करण्याची सुचना केली होती. त्यानुसार संबंधित प्राधिकरणांनी रस्ते दुरुस्तीची कामे केली. पण, पाऊस सुरु होताच रस्त्यांवर खड़्डे पडण्यास सुरुवात झाली. पाऊस थांबत नसल्यामुळे माती, खडी आणि राडारोडा टाकून खड्डे भरण्यात येत होते. पाऊस पडल्यानंतर ख़ड्डे उखडून त्यातील माती, खडी आणि राडारोडा इतरत्र पसरत होती. गणेशोत्सवापुर्वी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पालिकेने पुन्हा खड्डे भरणीची कामे केली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी रस्त्यावर इतरत्र पसरल्याने त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. बा‌ळकुम चौकाजवळील रस्त्यावर हे चित्र दिसून येत आहे. गणेशोत्सवापुर्वी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेने रस्त्यांची पाहाणी करून खड्ड्यांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार शहरातील रस्त्यांवर १ हजार ६४९ इतके खड्डे होते. त्यापैकी १ हजार ५१७ खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला होता. उर्वरित १२२ खड्डे भरणीची कामे सुरु असल्याचे पालिकेने म्हटले होते. गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली असून यामुळे पालिकेने शहरातील ररस्त्यांची पाहाणी करून खड्ड्यांची संख्या नोंद केली आहे. या आकडेवारीनुसार खड्डयांची संख्या २ हजार ६८ इतकी झाली असून यामुळे गेल्या १४ दिवसांत शहरात खड्ड्यांच्या संख्येत चारशेने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २ हजार ६८ पैकी १ हजार ९०८ खड्डे बुजविण्यात आल्याने केवळ १६० खड्डेच शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला. या दाव्यापेक्षा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा <<< ठाणे खाडीकिनारी मार्गात खारफुटी बाधित होणार?; पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले प्रश्न

प्रभाग समिती –             पडलेले खड्डे   बुजविलेले खड्डे    शिल्लक खड्डे

नौपाडा कोपरी                    ११६  १०४                   १२

उथळसर                       १५६         १४९         ७

कळवा                    २५८        २५०                ८

मुंब्रा                               ७२    ४९               २३

वागळे                    १७६    १६५                ११

वर्तकनगर                        ४१०     ३९०                  २०   

दिवा                              ५८२          ५६०                 २२

माजीवडा मानपाडा              १६३         १२९                  ३४

लोकमान्य सावरकर             १३५         ११२                  २३

एकूण                            २०६८        १९०८         १६०

Story img Loader