कुख्यात मटकाकिंग बाबू नाडर याच्या ठाणे पूर्वेतील जुगार अड्डय़ावर हाणामारी करून तेथील रोकड चोरल्याच्या आरोपावरून दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात अटकेत असलेल्या ठाणे पोलीस दलातील चार हवालदारांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. तर या प्रकरणाचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्यामुळे ठाणे ग्रामीण पोलीस दलातील हवालदार अद्याप निलंबित झालेला नाही. दरम्यान बाबू नाडर याने पोलीस ठाण्यात शिरून रोकड चोरणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश अंबुरे यांनी दिली.

Story img Loader