वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेच्या चार मित्रांचा बदलापुरजवळील कोंडेश्वर येथील कुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. स्वयंम बाबा मांजरेकर (१८), आकाश राजू झिंगा (१९) सुरज मछिंद्र साळवे ( १९) व लिनस भास्कर उच्चपवार (१९) अशी बुडालेल्या चौघांची नावे आहेत. ते मुंबईतील घाटकोपर कामराज नगर येथे राहणारे होते. आकाशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे चौघे मित्रांसह बदलापुर जवळच्या कोंडेश्वर येथे आले होते.
हेही वाचा >>>ठाणे स्थानक परिसरात आमदार संजय केळकर यांची पाहणी
त्यावेळी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या चौघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.