शहापूर : आदिवासी-कातकरी समाजातील महिलांचे तात्पुरते बचतगट स्थापन करून त्या महिलांच्या नावावर बँक आणि पतपुरवठा संस्थेमधून कर्ज काढून त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जाची रक्कम मिळालेली नसतानाही वसुली एजंटचा त्रास सुरू झाल्याने आदिवासी महिला हैराण झाल्या आहेत. या प्रकरणी किन्हवली पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली असून अशाप्रकारे शहापुर तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक झाली आहे.

शेणवा येथील सविता गणेश वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून किन्हवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणा दत्तात्रेय सिताराम रण आणि त्याची पत्नी गुलाब दत्तात्रेय रण या दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणात बँकेचे कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का, या दिशेने तपास करण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातील ठिकठिकाणच्या कातकरीवाडीतील गरीब गरजू आदिवासी महिलांना एका कर्ज प्रकरणी चार ते पाच हजार देऊन त्यांच्या नावावर विविध बँक आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमधून कर्ज काढण्यासाठी त्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली. या महिलांच्या अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवून त्यांचे तात्पुरते बचत गट स्थापन केले आणि या महिलांच्या नावावर विविध बँक तसेच पतपुरवठा संस्थांमधून ३० ते ७० हजारापर्यंत असे लाखो रुपयांचे कर्ज काढले. महिलांना मिळालेल्या कर्जाची सर्व रक्कम दलाल टोळीने महिलांकडून जमा केली आणि या कर्जाची फेड आम्ही करू असे सर्व महिलांना आश्वासन दिले. कर्जाचे पहिले हप्ते भरले. मात्र दुसऱ्याच महिन्यात हप्ते भरले नाहीत आणि स्वतःचे दूरध्वनी बंद करून उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. एकीकडे कर्ज देणाऱ्या बँका आणि पतपुरवठा संस्थांच्या वसुली एजंटांचा त्रास तर दुसरीकडे या टोळीची अरेरावी अशा दुहेरी संकटात अडकलेल्या काही आदिवासी महिला भयभीत झाल्या आहेत.

pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune cyber crime latest news
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरास ऐवजासह अटक
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड? (फोटो सौजन्य पीटीआय)
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड?
woman senior citizen , Fraud , fear of action,
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक, ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी
Two burglars arrested in Madhya Pradesh news in marathi
घरफोडया करणाऱ्या दोघांना मध्‍यप्रदेशात केले जेरबंद; चार गुन्‍हयांची कबुली, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत
bhandup police arrested accused who forced women into prostitution by luring money
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत

याप्रकरणात दत्तात्रेय रण आणि त्याची पत्नी गुलाब या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. तपासानंतरच नेमकी कितीची फसवणुक झाली आहे, हे समजू शकेल, असे शहापुरचे पोलीस उपअधीक्षक मिलींद शिंदे यांनी सांगितले

Story img Loader