लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: येथील एका औषध विक्रेत्याला तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करा. आम्ही त्या गुंतवणुकीतून दामदुप्पट लाभ मिळून देतो, असे आश्वासन देऊन तीन भामट्यांनी गेल्या पाच महिन्याच्या काळात येथील एका औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक केली.

गिरीशकुमार चम्पालाल व्यास (३६) अशी फसवणूक झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी मोहित शर्मा, रिचा गुप्ता आणि अंगद या तीन भामट्यांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारदार व्यास डोंबिवलीतील रामनगर भागात राहतात. ऑनलाईन व्यवहारातून ही फसवणूक झाली आहे.

आणखी वाचा-ऑक्टोबरनंतर डोंबिवलीतील २७ रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातील ३७२ कोटीच्या निधीतून कामे

पोलिसांनी सांगितले, एप्रिलपासून तिन्ही आरोपींनी औषध विक्रेते गिरीशकुमार यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यांना जी. टेक ट्रेडर्स, अभि एन्टरप्रायझेस या गुंतवणूक कंपन्यांमधील शेअर मधील गुंतवणूक योजनांची माहिती दिली. या शेअर बाजारातील गुंतवणुकीत आपण गुंतवणूक केली तर आपणास दामदुप्पट पैसे अल्पावधीत मिळतील, असे आश्वासन भामट्यांनी व्यास यांना दिले. व्यास यांचा विश्वास संपादन केल्यानंतर भामट्यांनी ऑनलाईन आरटीजीएस, गुगल पे, आयएमपीएस माध्यमातून व्यास यांच्याकडून ५० लाख ५२ हजार गुंतवणुकीसाठी लागणारे विविध कर भार, शेअर मधील ठेव रकमेच्या नावाने वसूल केले.

ही रक्कम तुम्हाला दामदुप्पट पध्दतीने पाहिजे तेव्हा मिळेल. .लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, असे भामट्यांनी व्यास यांना सांगितले. चार महिने उलटुनही लाभाचा एक पैसा बँक खात्यात जमा झाला नाही. अस्वस्थ झालेल्या व्यास यांनी मूळ रक्कम परत मागण्याचा तगादा भामट्यांकडे लावला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ते व्यासांच्या संपर्काला प्रतिसाद देईनासे झाले. सतत तगादा लावुनही लाभ नाहीच पण मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे याची खात्री व्यास यांना झाल्याने त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of 50 lakh with medicine seller in dombivli by giving lure of profit from the stock market mrj