लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : विवाह जुळविणाऱ्या ॲपच्या माध्यमातून ओळख करून एका भामट्याने ४७ वर्षीय महिलेची ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
फसवणूक झालेली महिला सरकारी कर्मचारी आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी विवाह जुळविणाऱ्या एका ॲपमध्ये त्यांचे खाते उघडले होते. या ॲपच्या माध्यमातून त्यांची ओळख एका तरुणासोबत झाली होती. त्याचे पुण्यात कपड्याचे दुकान असल्याचे त्याने सांगितले होते. महिलेने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्याने महिलेला भेटण्याचे टाळले होते. महिलेचा त्याच्यासोबत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बोलणे सुरू होते.
मार्च महिन्यात त्याने महिलेला गव्हरमेंट शेअर बाजार बंद होणार असून आठवड्यात दुप्पट परतावा मिळवून देतो असे सांगितले. महिलेने विश्वास ठेऊन टप्प्या टप्प्याने ९५ हजार रुपये पाठविले. परंतु त्याने महिलेला पैसे परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. परंतु त्याने महिलेला पैसे देणार नाही काय करायचे ते कर असे म्हणत धमकावले. अखेर महिलेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.