कल्याण पूर्वेतील एका वित्त पुरवठादाराची दोन औषध विक्रेत्यांनी ३५ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आम्ही पैसे परत करत नाहीत काय करायचे ते करा अशी उलट धमकी औषध विक्रेत्यांनी दिल्याने पुरवठादाराने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीकर वैतागले, अरुंद रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी, त्यात पालिकेच्या कचरा वाहू गाड्यांच्या बेफिकीरीची भर

जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सचिन विश्वकर्मा (गरीब नवाज चाळ, श्रीकृष्ण नगर, पत्रीपूल, कल्याण पूर्व), पवनकुमार शुक्ला (रा. चिंचपाडा, कल्याण) अशी आरोपींची नावे आहेत. साबु चेरीयन (४९, रा. साई गणेश विहार, विजयनगर, कल्याण पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत लघुलेखकाला सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

पोलिसांनी सांगितले, गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आरोपी सचिन विश्वकर्मा याने विश्वकर्मा मेडिकल दुकान, त्यामधील नुतनीकरणाच्या कामासाठी साबु चेरियन यांच्याकडून १८ लाख ३९ हजार रुपये कर्ज रुपाने घेतले होते. पवनकुमार शुक्लाने व्यवसाय करण्यासाठी आपणाकडून १७ लाख २५ हजार रुपये असे एकूण ३५ लाख ६४ हजार रुपये घेतले होते. साबु यांची नॅन्सी फायनान्स नावाची निर्मला निवास, काटेमानिवली, कल्याण पूर्व येथे कंपनी कार्यालय आहे. साबु यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून कर्जाऊ रक्कम घेऊन नंतर त्या रकमेचा दोघांनी अपहार केला. साबु यांची फसवणूक केली. आणि ते पैसे परत देणार नाहीत अशी भूमिका आरोपींनी घेतल्याने साबु यांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader