लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसीत राहणाऱ्या एका घाऊक औषध विक्रेत्याने तीन भामट्यांकडून हे चलन आपल्या मित्रांच्या ओळखीने चार लाख रूपयांच्या भारतीय चलनात अदलाबदलीने एका बंद पिशवीतून ताब्यात घेतले. या व्यवहारानंतर औषध विक्रेत्याने पिशवीत पाहिले तर नोटांच्या आकाराची दिनार चलनाची पेपर रद्दीची कागदी पुडकी आढळून आली. व्यवहारानंतर तिन्ही भामटे पळून गेले. औषध विक्रेत्याने या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Due to pending payments for four years 150 drug distributors stopped supplying medicines
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील औषध पुरवठा ठप्प, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुरवठा न करण्याचा वितरकांचा निर्णय
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट

भूपेंद्रनारायण बबन सिंग (५१) असे औषध विक्रेत्याचे नाव आहे. ते डोंबिवली एमआयडीसीतील सुदामानगर भागात आपल्या तीन मुलांसोबत राहतात. ते घाऊक औषध विक्रेता आहेत. पोलिसांनी सांगितले, भूपेंद्रनारायण सिंग यांचा मित्र रमेश जैस्वाल (३८, रा. दावडी) यांनी गेल्या आठवड्यात सिंग यांना सांगितले. आपला एक मित्र रामअभिलाख महादेव पटेल (५५, रा. चक्कीनाका, कल्याण) याच्या ओळखीच्या तीन व्यक्ति आहेत. त्यांच्याकडे दुबईच्या आर्थिक व्यवहारातील ७०० दिनार चलन आहे. ते हे चलन स्वस्तात देण्यास तयार आहेत. एक दिनारमागे ते २२०० रूपये मागत आहेत. या एकूण दिनार चलनाची भारतीय बाजारातील किंमत १२ लाख होत आहे.

आणखी वाचा-ठाणे : एमएमआरडीएकडून माती विल्हेवाटीसाठी तीन पर्यायांचा विचार

स्वस्तात दुबईचे दिनार चलन मिळत असल्याने भूपेंद्रनारायण सिंग यांनी ते चलन खरेदी करण्याची तयारी दर्शवली. रमेश जैस्वाल, रामअभिलाख पटेल हे सिंग यांच्या कार्यालयात दिनार चलन देणाऱ्या तीन व्यक्तिंना घेऊन आले. सिंग यांनी दिनार चलन घेण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला ३५० दिनार चार लाख रुपयांना घेणार असल्याचे सिंग यांनी तिघांना सांगितले. या चलनाची खात्री पटल्यावर उर्वरित आठ लाख रूपयांचे चलन ताब्यात घेऊन असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे दिनार चलनाचा हा बेनामी व्यवहार कोणाला कळू नये म्हणून निळजे गावाजवळील लोढा हेवन येथील बौध्दविहार येथे भेटण्याचे सिंग यांनी तीन व्यक्तिंना सांगितले.

आणखी वाचा- वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

शनिवारी दुपारी साडे बारा वाजता औषध विक्रेता सिंग, त्यांचे मित्र रमेश, रामअभिलाख हे निळजे गावाजवळील लोढा हेवनजवळील बौध्दविहार भागात गेले. तेथे तिन्ही व्यक्ति हातात दिनार चलनाच्या बंदिस्त केलेल्या पिशव्या घेऊन आले. सिंग यांनी जवळील भारतीय चलनातील चार लाख तिघांच्या ताब्यात दिले. एका व्यक्तिने जवळील दिनार चलन असलेली पिशवी सिंग यांच्या स्वाधीन केली. त्यानंतर काहीही न बोलता ते तात्काळ घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर सिंग यांनी वाहनात बसल्यावर बंदिस्त पिशवी उघडून बघितली तर त्यात नोटांच्या आकाराचे बंदिस्त केलेले पेपर रद्दीचे तुकडे होते. हे रद्दी तुकडे बघून सिंग यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ मित्रांसह परिसरात तीन जणांचा शोध घेतला, पण ते पळून गेले होते. आपणास दिनार चलनाऐवजी रद्दीचे तुकडे देऊन तीन इसमांनी आपली फसवणूक केली म्हणून सिंग यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Story img Loader