लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : आपल्या आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून अन्य इसमाने काही गैरव्यवहार केले आहेत. आपण ऑनलाईन मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमवले आहेत. आपण गुन्हेगार आहात, अशा धमक्या देत मुंबईतून बोलणाऱ्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी डोंबिवली जवळील पलावा गृहसंकुलात राहणाऱ्या एका ६९ वर्षाच्या सेवानिवृत्ताची ७४ लाख रूपयांची फसवणूक केली आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

एका परदेशी कंपनीतून हे गृहस्थ वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. ते पलावा येथे पत्नीसह राहतात. काही दिवसापूर्वी या निवृत्त व्यक्तीला मोबाईलवर एका व्यक्तीने संपर्क केला. मी मुंबईतील एका पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलतो. तुम्ही नवीन मोबाईल सीमकार्ड घेतले आहे. या कार्डसाठी तुम्ही वापरलेल्या आधारकार्डच्या माध्यमातून अन्य एका इसमाने गैरव्यवहार केले आहेत. तुम्ही मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमवले आहेत, असे बोलत तोतया पोलीस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला गोंधळून टाकले. तुम्ही केलेल्या गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार आमच्याकडे चौकशीसाठी आली आहे. या प्रकरणात आम्ही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस पाठवत आहोत. तुम्हाला अटक करण्याचा हुकूम आमच्याकडे आहे. आणि तुम्हाला अटकही करू शकतो, असे दुसऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला सांगितले.

आणखी वाचा-स्थलांतरीत पक्ष्यांची जिल्ह्याकडे यंदाही पाठ, डोंबिवलीतील मुख्य ठिकाणी मोजक्याच पक्ष्यांची नोंद, वसईत १२८ प्रजातींची निरीक्षकांडून नोंद

या सगळ्या प्रकाराने सेवानिवृत्त गोंधळून गेले. मी नवीन सीमकार्ड घेतलेले नाही. ऑनलाईन व्यवहारातून माझ्याकडे पैसे आले नाहीत. मी कोणताही गैरव्यवहार केला नाही. मी कमविलेल्या पैशातून माझा उदरनिर्वाह करतो, असे सेवानिवृत्ताने तोतया पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. तोतया पोलीस अधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही गैरव्यवहार केला हे सिध्द करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढी आमच्याकडे तपासासाठी वळती करा. याबाबतची चौकशी करून ती रक्कम नंतर तुम्हाला पुन्हा परत तुमच्या बँक खात्यावर पाठविली जाईल, असे तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-कळवा-खारेगावातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी घाबरून सोडल्याने सेवानिवृत्ताने ७४ लाखाची रक्कम तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर वळती केली. घडला प्रकार सेवानिवृत्ताने आपल्या मित्राला सांगितला. मित्राने आपली फसवणूक झाल्याचे सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सांगितले. सेवानिवृत्ताने तातडीने सायबर गुन्हे आणि मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader