आम्ही तुमच्या घरातील सामान, वाहन केऱळ मधील तुमच्या गावी व्यवस्थितपणे पोहचवितो, असे कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील सेवानिवृत्त गृहस्थांना सांगून माल वाहतूक सेवा देणाऱ्या एका खासगी एजन्सीने सेवानिवृत्ताची ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. घरातून गावी पाठविण्यासाठी एजन्सीच्या ताब्यात दिलेले सामान, वाहन एजन्सीने गावी पोहचविलेच नाही, याऊलट दुचाकी हवी असेल तर १० हजार रुपये पाठवा अशी मागणी करुन सेवानिवृत्ताला धमकविण्याचा प्रकार एजन्सीने केला आहे.

हेही वाचा >>> करोना काळात मृत पावलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेतील २१ मृत कामगारांच्या वारसांसाठी १० कोटी ५० लाखाचा निधी

Fraud by taking loans in the name of tribal women in Shahapur
शहापुरात आदिवासी महिलांच्या नावावर कर्ज घेऊन फसवणुक; एका दाम्पत्याला पोलिसांनी केली अटक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
सायबर गुन्हेगारांचे पैसे अशिक्षित, बेरोजगारांच्या खात्यात, भिवंडी शहरातून सायबर गुन्हे करणारी टोळी गजांआड
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
corruption, ST , Nana Patole,
जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा – नाना पटोले

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या गृहस्थाने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

पोलिसांनी सांगितले, जॉॅन जोसेफ (६४, रा. श्री कृपा होम सोसायटी, मलंग रोड, काटेमानिवली, कल्याण पूर्व) हे मध्य रेल्वेच्या परेल कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते केरळ येथील मूळ निवासी आहेत. नोकरी निमित्त ते कल्याण मध्ये राहत होते. निवृत्त झाल्याने त्यांनी केरळ मधील पथनमथिटा जिल्ह्यातील कोडल मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> ठाणे: रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू केले नाही म्हणून कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

घरातील सर्व सामान, दुचाकी गावी नेण्यासाठी हस्नाईन मलिक लॉजिस्टिक सर्व्हिसेस या माल वाहतूकदार कंपनीशी ऑनलाईन माध्यमातून जाॅन यांच्या मुलाने संपर्क केला. कल्याण येथून केरळातील कोडल गावी घरगुती सामान नेण्याची नोंदणी केली. कंपनीचे व्यवस्थापक राहुल आणि त्याच्या साथीदाराने सामान वाहतुकीची हमी घेतली. या वाहतुकीसाठी जाॅन जोसेफ यांनी हस्नाईन कंपनीकडे ५२ हजार रुपये सप्टेंबरमध्ये भरणा केले. दोन महिन्यापूर्वी हस्नाईन कंपनीचा कामगार टेम्पो घेऊन आला. त्याने घरातील बांधलेले सामान टेम्पोत चढविले. दुचाकी वाहन सोबत ठेवण्यात आले. हे सामान दोन दिवसात केरळ येथे पोहचेल असे सांगून कामगार तेथून निघून गेला.

जॉन आपल्या कुटुंबीयांसह रेल्वेने केरळ येथे जाणार होते. दोन दिवस उलटूनही हस्नाईन कंपनी कडून केरळ येथे सामान पोहचले नाही म्हणून जॉन यांनी कंपनीकडे संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यांना तेथून प्रतिसाद मिळेनास झाला. ते अस्वस्थ झाले. हस्नाईन कंपनीतून सतत संपर्कात असलेल्या राहुल, मिश्रा यांना त्यांनी संपर्क केला. त्यांचे मोबाईल फोन बंद होते. सामान नेले कोणी आणि कुठे असा विचार सुरू असतानाच मिश्रा नावाच्या इसमाने जॉन यांचे नातेवाईक लिन्सी यांच्या मोबाईलवर संपर्क करुन तुम्हाला तुमची दुचाकी परत हवी असेल तर १० हजार रुपये गुगल पेव्दारे पाठवा. पैसे पाठविले नाहीतर दुचाकी परत मिळणार नाही, अशी धमकी दिली. आमचे सामान कुठे आहे. तुम्ही कोठुन बोलता असे बोलण्या आधीच भामट्याने फोन बंद केला. आपली व मुलाची हस्नाईन माल वाहतूक सेवा कंपनीकडून फसवणूक झाली आहे लक्षात आल्यावर जाॅन जोसेफ यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हस्नाईन लॉजिस्टिक कंपनी विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Story img Loader