ठाणे : महापालिकेच्या आस्थापनेवरील ३५ वर्षांवरील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. चांगला समाज घडविण्यासाठी सुदृढ, निरोगी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असणे गरजेचे असून यामुळेच आयुक्तांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी महिला दैनंदिन नागरी हिताची कामे करीत असतात. परंतु लोकोपयोगी नागरी कामे करताना त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे अनावधानाने दुर्लक्ष होते. चांगला समाज घडविण्यासाठी सुदृढ व निरोगी अधिकारी व कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे. त्यामुळे महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांना उद्भवणाऱ्या दुर्धर आजारांचे वेळीच निदान व्हावे, यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाचा कर्करोग या चाचण्या आणि मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून तसे आदेश त्यांनी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सोनोमॅमोग्राफी आणि रक्त तपासण्यासाठी शुल्क आकारले जात होते. परंतु या सर्व चाचण्या महापालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत केल्या जाणार आहेत. यापुढे सातत्याने ही योजना महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी महिलांसाठी सुरू राहणार असून त्यांनी आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्राधान्याने या चाचण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.

Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

हेही वाचा >>>भिवंडीतील चोरांकडून कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीच्या घटना

हेही वाचा >>>६५ बेकायदा इमारत प्रकरण, कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांची पोलिसांच्या ‘एसआयटी’कडून चौकशी

जगभरात पक्षघात, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या असंसर्गजन्य आजारांमुळे सुमारे ७४ टक्के नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने अशा आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्याचे ध्येय ठेवलेले आहे. कुटूंबातील सदस्यांवर व सामाजिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहता, अशा आजारांच्या आवश्यक असलेल्या तपासण्या वेळीच करून त्यावर त्वरीत उपचार करणे, ही काळाची प्राथमिक गरज आहे. तसेच मधुमेह व रक्तदाब हे आजार रुग्णांच्या नकळत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घर करुन मृत्यूस कारणीभूत ठरत असतात. महिलांमध्ये असलेल्या स्तनाचा व गर्भपिशवीचा कर्करोग या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या आजारांची तपासणी करून ते समुळ नाहीसे करणे शक्य आहे. यासाठी महिलांनी देखील गांभिर्याने व काळजीपूर्वक अशा चाचण्या करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच पालिकेने महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे.