शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य दरात मोबदला मिळावा तसेच ग्राहक आणि शेतकऱ्यांमध्ये थेट व्यवहार व्हावा यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची थेट घरपोच विक्री करण्याचा आणखी एक प्रयोग बुधवारपासून ठाण्यात सुरु होत आहे. ‘शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड’ या संस्थेच्या माध्यमातून नाशिकजवळच्या उगाव गावातील शेतकऱ्यांची उत्तम दर्जाची भाजी ठाण्यात घरोघरी पोहचवली जाणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहकांकडून भाज्यांची यादी मागवण्यात येणार असून शेतकऱ्यांचा भाजीपाला या माध्यमातून थेट घरात पोहचणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरी सांभाळून बाजारहाट करण्याऱ्या गृहिणींसाठी भाज्यांची घरपोच सेवा सोईस्कर ठरणार असल्याने ठाणेकर गृहिणींचा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा आशावाद संस्थेकडून व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची थेट विक्री ग्राहकांना करण्यासाठी ठाण्यातील घोडांदर येथील २हिरानंदानी इस्टेट येथे बुधवारी भाज्यांच्या दुकानाचे उद्घाटन होणार आहे.बाजारातील दलालांचा हस्तक्षेप कमी होऊन शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, ग्राहकांना भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे आर्थिक नुकसान पोहचू नये यासाठी ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ठाणे पोलीसांतर्फे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची थेट विक्री ग्राहकांना करण्याचा उपक्रम काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आला. शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी नुकताच सुरु झालेला भाजीविक्रीसाठी फिरत्या वाहनाचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. याच पाश्र्वभूमीवर शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट घरपोच पोहचवला जाणार आहे. www.shopforchange.in  या संकेतस्थळावर भाजीपाला विकत घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांची नोंदणी करण्यात येणार आहे.

भाजीपाल्याची घरपोच सेवा या उपक्रमामुळे अभ्यास सांभाळून काम करु इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. घरपोच सेवा पुरवताना देखील भाज्यांचे दर शेतकऱ्यांशी चर्चा करुन ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुरवठा आणि वाहतूक खर्च यात असेल याची कल्पना शेतकऱ्यांना दिली आहे.   – समीर आठवले,  शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड