ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोईसाठी मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये डाॅक्टर, परिचारिका उपलब्ध असणार आहे. फिरत्या दवाखान्यामुळे रुग्णांवर प्राथमिक उपचार करता येणार आहे. तसेच दवाखान्यामध्ये नागरिकांना रक्ताच्या प्राथमिक चाचण्या करता येणे शक्य होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांना त्यांच्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने फिरता दवाखाना सुरू केला आहे. रुग्णवाहिकांमध्ये विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तयार करून हा फिरता दवाखाना तयार करण्यात आला आहे. दवाखान्याचे उद्घाटन बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा – भाईंदर : वाढदिवसानिमित्त आमदार गीता जैन यांची स्टंटबाजी, कॅमेर्‍यासमोर केली पालिका शौचालयाची साफसफाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी दररोज सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत हा मोफत दवाखाना उपलब्ध असणार आहे. फिरत्या दवाखान्यामध्ये डॉक्टर, परिचारिका उपलब्ध असतील. दवाखान्यामध्ये नागरिकांना रक्ताच्या प्राथमिक चाचण्या करता येणे शक्य होईल. तसेच रुग्णांना प्राथमिक उपचार उपलब्ध होणार आहेत. हा दवाखाना शहरातील झोपडपट्टी परिसरात फिरणार असल्यामुळे नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.