कल्याण : शासन निर्णयानुसार कल्याण – डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बसमधून पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांहून अधिक वय) केडीएमटीच्या बसमधून शनिवारपासून (ता.१६) मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने शक्रवारी घेतला. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे.

हेही वाचा >>> देशात तपासयंत्रणा हाताशी धरून खडणीचे रॅकेट, राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

कल्याण महानगर परिवहन महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर या महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या भिवंडी पालिका, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ, बदलापूर पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, महिलांना या सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीव्दारे आयुक्त, वाहतूक, परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शासनाने गुरुवारी कल्याण-डोंबिवली पालिकेसह लगतच्या महापालिकांचे कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर डोंबिवलीचा प्रवासी एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी शहरापर्यंत प्रवास करू शकणार आहे. उलट दिशेने भिवंडीकडून डोंबिवलीपर्यंत प्रवास करू शकणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून या महामंडळाच्या स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. तसेच बैठकीमध्ये महामंडळाचे पुढील नियोजन आणि धोरणात्मक निर्णयाबाबत माहिती देण्यात आली.

Story img Loader