सध्याच्या अत्यंत धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात मैत्रीसारखे दिलासा देणारे दुसरे औषध नाही. गरीब-श्रीमंत, लहान-थोर असे कोणतेही बंध मैत्रीच्या आड येत नाहीत.
मैत्रीचे नाते प्रदर्शित करायला कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते. मात्र तरीही इतर सर्व नात्यांप्रमाणे जगातील या सगळ्यात सुंदर नात्याचाही एक विशिष्ट दिवस असावा म्हणून ऑगस्टचा पहिला रविवार निश्चित करण्यात आला. मात्र मैत्रीच्या या उत्सवास एक दिवस पुरत नाही. त्यामुळे अगदी महिनाभर मैत्री दिनाचे सोहळे कुठे न् कुठे सुरू असतात. नुकत्याच सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये तर मैत्री दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मैत्री दिनाचा हा उत्साह आता केवळ तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी सर्व वयोगटांत आता मैत्री दिन साजरा होऊ लागला आहे. ‘तणावमुक्तीचे साधे, सोपे सूत्र’ हेच मैत्री दिनाच्या वाढत्या प्रस्थाचे मर्म आहे..
इन फोकस : तणावमुक्तीचे साधे, सोपे सूत्र
सध्याच्या अत्यंत धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात मैत्रीसारखे दिलासा देणारे दुसरे औषध नाही. गरीब-श्रीमंत, लहान-थोर असे कोणतेही बंध मैत्रीच्या आड येत नाहीत.

First published on: 05-08-2015 at 12:29 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship day photos